- विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांचा नगरसेवकांनाच प्रतिप्रश्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) : राष्ट्रवादीच्या इच्छूक नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला. ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, वैशाली घोडेकर यांनी आपण इच्छूक असल्याचे अजितदादांना सांगितले.
अजित पवार यांनी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा पक्षाचा निर्णय आहे. इच्छुकांची पत्रे मला मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घ्यावी. इच्छुकांची नावे मला पाठवावीत, असा आदेश शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना दिला आहे. अजित पवार आज शहराच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.