न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) : मावळातील पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात धरण क्षेत्रात ३७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात ४.५५ टक्क्यांनी वाढ झाली असून साठा ४६.७३ टक्के झाला आहे.
त्यामुळे तूर्तास पिंपरी-चिंचवडकरावरील अधिकचे पाणी कपातीचे संकट टळले आहे.