न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी ते फूगेवाडी दरम्यान मेट्रोची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. संत तुकाराम नगर व फुगेवाडी या दोन स्थानकांचे ६० टक्के कामही बरेचसे पुर्ण झाले आहे. यापूर्वी एकदा मेट्रोची चाचणी झाली आहे. पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार आहे.
दोन कोच असलेली मेट्रो पिंपरी ते फुगेवाडी या ५ किलोमीटरच्या अंतरावर चालवून पाहिली जाईल. मेट्रोने हा प्राधान्य मार्ग जाहीर केला होता. या मार्गावर असलेल्या संत तुकाराम नगर व फुगेवाडी या दोन स्थानकांचे कामही गतीने करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म, छत अशी कामे झाली आहेत. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात या मार्गावर पुन्हा चाचणी होत आहे.