न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीला पैसे देण्यास फिर्यादीने नकार दिला. यावरून फिर्यादीस आरोपीने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर टोकदार वस्तू फिर्यादी यांच्या हातावर आणि मानेवर मारून जखमी केले.
ही घटना गुरुवारी (दि. ६) सकाळी नऊ वाजता पिंपरी येथील भारतनगर झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी ओंकार मारुती कामत (वय १७) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मतीन अकबर कुरेशी (वय २६, रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.