न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची नियुक्ती झाली आहे. प्रकाश जाधव हे गेली २६ वर्षांपासून मराठा सेवा संघाचे कार्य करतात. आजवर त्यांनी मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष तसेच केरळ राज्याचे प्रभारी म्हणून कार्य केले आहे.
तसेच प्रकाश जाधव हे धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप. बँकेचे माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बँक असोसिएशनचे माजी संचालक व पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी संचालक आहेत. सध्या मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, सहकार क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.