न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. ०७ ऑगस्ट) रोजी ११२१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील १६ आणि हद्दीबाहेरील ०५ अशा २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात रहाटणीतील ६५वर्षीय महिला, पिंपळे गुरव येथील ६० वर्षीय महिला, मोरवाडीतील ६२ वर्षीय पुरुष, पिंपरी, संत तुकारामनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, थेरगावातील ६५ वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडीतील ६५ वर्षीय महिला, मोशीतील ६० वर्षीय महिला, ७४ वर्षीय वृद्ध, काळेवाडीतील ६४ वर्षीय महिला, दापोडीतील ७० वर्षीय महिला, रुपीनगर निगडीतील ७० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, दिघीतील ७० वर्षीय पुरुष, बिजलीनगर येथील ६५ वर्षीय महिला, नेहरुनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, शिरुर येथील ३६ वर्षाचा युवक, नारायणगाव मधील ८५ वर्षीय वृद्ध, चाकण येथील ४४ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, येरवड्यातील ७४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७०७८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४८२७ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८७९४ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.