न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२०) :- पिंपरीतील डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजने २४ ऑगस्ट रोजी फिजिकल परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. ९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थांना कॉलेजमध्ये येणाचा आदेश देण्यात आला आहे.
नियमांनुसार ९ ऑगस्टपासून दोन आठवडे विद्यार्थांना क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागेल, असा आदेश डी. वाय पाटील या कॉलेजने काढला आहे. म्हणजे वेळपत्रकानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉलेजला घेता येईल. पुणे मिररच्या वृत्तानुसार, कॉलेजकडून विद्यार्थी पुण्यात आल्यानंतर आणि पुण्यातून बाहेर जाताना कोविड टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.
दरम्यान अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी कॉलेजच्या निर्णयानंतर परीक्षा रद्द कराव्यात, यासाठी राज्यातील ठाकरे सरकारला पत्र लिहलं आहे. या पत्रावर ६३ विद्यार्थ्यांच्या डिजिटल सह्या आहेत.