न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट. २०२०) :- टिक-टॉक स्टार राहुल हा स्वप्नीलसह भोसरी येथील मुख्य पुलाखाली दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस कर्मचारी गणेश सावंत आणि नितीन खेसे यांना मिळाली.
त्यानुसार संबंधित ठिकाणी पथकातील इतर कर्मचाऱ्यांसह सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे मिळालेल्या दुचाकी चोरीच्या असल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी दहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
खडकी, सांगवी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील ८ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. त्यांच्याकडून एकूण जवळपास चार लाख रुपयांच्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. राहुल मोहन पवार वय-१९ असे टिक-टॉक स्टारचे नाव असून त्याचा मित्र स्वप्नील राजू काटकर वर-१९ अशी दुचाकी चोरण्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. हे दोघे खडकी, सांगवी आणि भोसरी एमआयडीसी परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी चोरत होते.