न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपायुक्त सुधीर हिरेमठ, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त आर.आर.पाटील, संजय नाईक – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार शिंदे, सतीश माने, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन चव्हाण दत्ता कदम यांच्या पथकाने चिखलीच्या घरकुल परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आक्या बॉण्ड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोकाचा प्रस्ताव तयार केला.
त्या अनुषंगाने आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहोळ (वय १९, रा. महालक्ष्मी हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली), विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय २२, रा. जिजामाता हौसिंग सोसायटी, शरदनगर, चिखली), शोएब इजराईल शेख (वय 19, रा.साई कृपा हौसिंग सोसायटी, घरकुल), विशाल रामधन खरात (वय २०, रा. फातिमा मज्जीद समोर, ओटास्किम) व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार अशांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या टोळीवर १८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.