न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीत उद्या बुधवारी होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिसांकडून कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अति वरिष्ठ अधिका-यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यास त्या नागरिकांवर देखील पोलीस कारवाई करणार आहेत.
शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. कृष्ण मंदिरात आरती, भजन करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, फटाके फोडणे, मिरवणूक काढणे, प्रतिमा पूजन यांसारख्या कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आली आहे.