न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक संघटना अधिक मजबुत करण्यासाठी नवीन पदनियुक्त्या करण्यात येणार आहेत.
हा कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या वाकड येथील जनसंपर्क कार्यालयात रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
आगामी काळात येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन युवक संघटनेला बळकटी देण्यासाठी शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय नियुक्त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती वाकडकर यांनी दिली.