न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- निगडी प्राधिकरण परिसरात एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून, चोरट्याने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत या वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या- चांदीचे दागिणे व ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख रुपयांचा लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेत वृद्ध महिला जखमी झाली असून त्यांच्या हातावर मारहाणीचे व्रण उमटले आहेत. निगडी पोलिसात त्यांनी फिर्याद दिली असून अज्ञात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमलता पाटील असे वृद्ध महिलेचे नाव आहे. हेमलता या गायत्री हेरिटेज सोसायटीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.