न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या पथ विक्रीसाठी विशेष लघुपत पुरवठा सुविधा योजनेची पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे अति. आयुक्त अजित पवार यांनी मनपा सभाग्रहात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी सहा.आयुक्त प्रशांत जोशी, प्रकल्प अधिकारी उल्हास जगताप, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष तथा मनपा सदस्य काशिनाथ नखाते, प्रसाद कांबळे, लिड बँक व्यवस्थापक आनंद बेडेकर, सहा आयुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, अभीदा भोसले आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये आज बैठक झाली. उल्हास जगताप यांनी योजनेबाबत सादरीकरण केले व योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली. यापुढे अजित पवार यांनी दहा हजार अल्प कर्ज स्वरुपात ही योजना अधिकाधिक विक्रेत्या पर्यंत पोहोचण्यासाठी महापालिका व संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करून यशस्वीरित्या करू. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार बैठक घेऊन त्यांना कशा पद्धतीने लाभ देता येईल, असे आश्वासन दिले.
त्याचबरोबर यापूर्वी सन २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ज्या विक्रेत्याकडे फेरीवाला प्रमाणपत्र आहे त्यांना पहिले प्राधान्य देऊन इतर लोकांचा समावेश कशा पद्धतीने करता येईल याबाबत कारवाई करू असे नमूद केले.
नखाते म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून सन २०१२ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या २४६ हॉकर्स झोन बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा महापालिकेच्या वतीने फेरिवालयाना देण्यात आलेल्या विक्री पास हे अल्प असून यामध्ये अधिक वाढ करण्याची गरज आहे अतिक्रमण पथकाकडून वारंवार कारवाई करण्यात येत आहे सध्या करोना ची परिस्थिती असल्यामुळे विक्रेत्याकडे कसे जगावे असा प्रश्न आहे आणि या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे . त्यामुळे त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहून त्यांना तातडीने विक्री करण्याची मुभा देण्यात यावी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरिवाल्याना व्यावसायास नियम अटींवर तातडीने सुरुवात करण्यास परवानगी द्यावी अशी मागाणी नखाते यानी केली.