न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. ऑगस्ट. २०२०) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ७४ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
ध्वजारोहन विष्णू तांबे (भिकोबा तांबे स्कूलचे संस्थापक) यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष चिकणे, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, सुखदेव कांबळे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रटरी संदीप चाबुकस्वार व मुख्याध्यापिका मिसेस कल्पना डिक्रुझ उपस्थित होते.
यावेळी नेहा कोटेचा व रेणू राठी मॅडम यांनी संस्थेचे संस्थापक व मुख्याध्यापिका यांच्या मार्गदशनाखाली ऑनलाईन टेकनॉलॉजिचा वापर करून इ. ४ व इ ५ वीच्या विध्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थांनी विविध स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा परिधान करून व देशभक्ती गीत गाऊन घरूनच स्वातंत्र्य दिवस साजरा केला. तसेच सचिन कळसाईत सर, वैशाली शिंदे, रिटा राजभोर व सिल्व्हेनिया जाधव मॅडम यांनी भाषण केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,कार्यक्रमात उपस्थित होते.
सूत्रसंचालन उत्कर्षा पाटील यांनी केले. तसेच पाहुण्यांचे आभार प्रज्योत कौर यांनी केले.