न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- मावळातील पवना धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात १०८ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
यामुळे धरणातील पाणीसाठ्यात ४. ७३ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण साठा ७२.५३ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – ९८.६२ टक्के इतका होता. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे साठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.