न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही संस्थेचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान सामाजिक सुरक्षिततेचे पालन करण्यात आले होते.
यावेळी चिखली पोलिस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक, आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत, प्राध्यापक वृंद आदी उपस्थिती होते.
ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थी व पालकांपर्यत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. उपस्थित प्रमुख पाहुणे, पोलिस अधिकारी यांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांशी ध्वजारोहनाबाबत तसेच कोरोना विषाणुपासून सावधानता कशी बाळगावी, याविषयी संवाद साधला. विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व कमेंट्सही आल्या. विद्यार्थ्यांनी ऑनलाइनद्वारे ध्वजारोहनाचा वेगळा आनंद व अनुभव अनुभवला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत कॉलेजची विद्यार्थिनी कु. अनुष्का गाड़े, सूत्रसंचालन कु. पायल झोरे यांनी तर, आभार प्रदर्शन विभागप्रमुख अमोल भागवत यांनी केले.