न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशांसाठीच्या प्रक्रियेतील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फे रीतील प्रवेशासाठी ३ सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, करोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत असल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या फे रीत प्रवेश जाहीर झालेल्या ४०,०१३ विद्यार्थ्यांपैकी २२,४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, तर २५ ,००९ विद्यार्थ्यांनी प्रोसिड फॉर अॅडमिशन के ले आहे. प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्याने प्रवेश जाहीर होऊन आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आज प्रवेश घेता येईल, अशी माहिती प्रवेश नियंत्रण समितीने दिली.
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
रिक्त जागांची यादी : ४ सप्टेंबर
पसंतीक्रम नोंदवणे : ५ ते ७ सप्टेंबर
दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी : १० सप्टेंबर
प्रवेश निश्चिती : १० ते १२ सप्टेंबर