न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- मृत लखीचंद आणि आरोपी अनिता पती-पत्नी आहेत. लखीचंद हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दारू पिऊन तिला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून अनिताने तिचा चुलत भाऊ आरोपी तुकाराम याच्यासोबत मिळून लखीचंद यांचा गळा दाबून खून केला.
ही घटना रविवारी (दि. ६) रात्री दहा वाजता जाधववस्ती येथे घडली. लखीचंद प्रभुदयाल शर्मा (वय ४०, रा. जाधववस्ती, ता. हवेली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. प्रेमचंद प्रभुदयाल शर्मा (वय ५८) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पत्नी अनिता लखीचंद शर्मा (वय ३५), पत्नीचा भाऊ तुकाराम भीमाशंकर नाटेकर (वय २९) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तुकाराम याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.