न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- गांजा विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रावेत परिसरातून ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६८ हजार ३०५ रुपयांचा २ किलो ७२३ ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई धस यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन विश्वनाथ झेंडे (वय ३८, रा. ताथवडे) याच्यावर पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), (ii) (ब) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.