न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- लोणावळा परिसरातील पवना डॅम येथील सुशांतसिंहच्या हँग आऊट फार्म हाऊसवर अंमली पदार्थ विरोधी पथक दुपारी पोहचले आहे. फार्म हाऊसवर तपासणी सुरू आहे. दरम्यान, येथे मीडियाला मज्जाव करण्यात आला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आराम करण्यासाठी लोणावळा परिसरतील पवना डॅम येथे असलेल्या हँग आऊट फार्म हाऊसवर येत असे. इथे अनेकदा रिया देखील आल्याचं सांगण्यात येत आहे. हे फार्म हाऊस हे भाडेतत्वावर घेतले होते अशी ही माहिती आहे. सुशांतच्या आत्महत्यानंतर येथील फार्म हाऊसवरील एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात सुशांत हा या ठिकाणी आला असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, एनसीबी ने रियाला अटक केल्यानंतर आज दुपारी मुंबई येथील अंमली पदार्थ पथक हे सुशांतच्या हँग आऊट फार्म हाऊसवर पोहचले असून तिथे काही धागेदोरे हाती लागतात का ते पथकातील अधिकारी पाहात आहेत.