न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात १०८ पदांसाठी शिक्षक भरती मानधन तत्वावर करण्यात येणार आहे. यामध्ये २२ उर्दू माध्यमाचे शिक्षक असतील. उर्वरित मराठी माध्यमांसाठी भरती होणार आहे. इच्छुकांनी अर्ज महापालिकेमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत.
त्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार निवड करण्यात येईल. मुलाखत होणार नाही. या शिक्षकांना १७,५०० प्रति महिना याप्रमाणे मानधन देण्यात येईल. यामध्ये बी. एस्सी, बी. एड ३२ पद, बी. ए. बी. एड इंग्रजी विषयांची ९ पद, बी. ए. बी. एड मराठी विषयाची १३ पद, बी. ए. बी. एड. हिंदी विषयाची १२ पद, बी.ए.बी.एड. भुगोल विषयाची ०३, बी.ए.बी.एड इतिहास विषयाची ०३, बी.पी.एड. क्रीडा प्रशिक्षक १३ पदे तर उर्दु माध्यमांची बी.एस्सी.बी. एड पदे ०८ , बी.ए. बी.एड उर्दु भुगोल पदे ०८ , बी . ए . बी.एड , इग्रंजी इतिहास यासाठी ०६ पदांची भरती सुरू आहे.