न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- भोसरीमधील गव्हाणे वस्ती एका व्यक्तीला गेल्या आठ दिवसांपासून थंडी, ताप आणि खोकला येत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांना दाखवले. मात्र, तुम्हाला कोरोनाची लक्षण आहेत. तुम्ही टेस्ट करून घ्या असा सल्ला देत अधिक उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. मात्र, आज शुक्रवारी पहाटे च्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी यांनी म्हटलं आहे की, मला गेल्या आठ दिवसांपासून थंडी, ताप आणि खोकला येत होता. डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी करोनाची भीती घातली, मी आत्महत्या करत आहे. यासाठी कोणाला जबाबदार धरू नये असं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी म्हटले आहे.
मात्र, त्यांनी कोणत्या डॉक्टरांकडे तपासणी केली हे समजू शकले नाही. शिवाजी मारुती होळकर (वय ६७ वर्षे, रा. गव्हाणे वस्ती भोसरी, असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.