न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर. २०२०):- भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील एका ५५ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. १२) रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा त्याआधीच मृत्यू झालेला होता. त्यांन ह्रदयाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी ह्र्दयशस्रक्रिया झाली होती. आजारपणाच्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज नातेवाईकांकडून वर्तविण्यात येत आहे. भरतलाल रामदास यादव (वय ५५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.