न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. १५ सप्टेंबर २०२०) :- कोरोना कोविडमुळे दिवसेंदिवस रिक्षाचालकांचे प्रश्न अत्यंत गंभीर होत असून व्यवसाय नसल्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. बिकट परिस्थितीमध्ये रिक्षाचालकांना सरकारच्यावतीने आर्थिक मदत होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने वीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जरी जाहिर केले परंतु रिक्षा टॅक्सी आणि वाहक यांना कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नाही. जसे महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफी केले तसेच रिक्षाचालकांच्या हप्ते व कर्ज माफ करावी अशी आमची मागणी आहे.
कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्याकडून तगादा लागला जात आहे. कर्जमाफी ऐवजी वसुली केली जात आहे. याबाबत कारवाई करावी रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे व महाराष्ट्र सरकारने प्रत्येक रिक्षा चालकास १०,०००/- रु. अनुदान द्यावे आदी रिक्षाचालकांच्या मागण्या असून या मांडण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक रिक्षा स्टँडवर हे आंदोलन होणार असून, सर्व रिक्षा चालकांनी सकाळी ११ वाजता रिक्षा स्टॅन्डवर एकत्र येऊन आणि आपल्या रिक्षासमोर उभे राहून बोंबाबोंब आंदोलन करावे.
रिक्षाचे सर्व हप्ते माफ करावे, शेतकऱ्यांन प्रमाणे रिक्षाचालक आत्महत्या करत आहे. शेतकर्यांना कर्ज माफी दिली पाहिजे. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथे बैठक आयोजन करण्यात आली होती, यावेळी बाबासाहेब ढवळे, विजय ढगारे, सचिन कदम, संतोष पवार, संतोष उबाळे, सचिन कांबळे, निलेश वाघुले, संतोष मस्के,अजय साळवे ,नासिर बिराजदार ,वाजिद शेख, प्रवीण ठोके, विकी चव्हाण आदि उपस्थित होते.
या वेळी बाबा कांबळे म्हणाले गेल्या सात महिन्यांपासून रिक्षाव्यवसाय बंद असून रिक्षाचालकांचे आर्थिक प्रश्न अत्यंत बिकट झाली असून त्यांचे अतोनात हाल सुरू ते व्हेंटिलेटरवर आहेत रिक्षा आणि टॅक्सी चालक व्हेंटिलेटरवर असून त्यांचे जीवन हे सरकारच्या हातामध्ये आहे रिक्षाचालकांना जीवनदान दिले पाहिजे यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे परंतु सरकारने आतापर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही त्यामुळे अस्वस्थता वाढत असून लवकरात लवकर सरकारने मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे बाबा कांबळे म्हणाले