- १६ जणांचा मृत्यू तर, ११८८ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. १५ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) रोजी ९९७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११८८ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात निगडी (पुरुष ६८ वर्षे), बिजलीनगर (स्त्री ७५ वर्षे), विद्यानगर (स्त्री २५ वर्षे), पिंपळेगुरव (पुरुष ५५ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६५ वर्षे), चिंचवडगाव (स्त्री ७३ वर्षे,पुरुष ७१ वर्षे), संभाजीनगर (पुरुष ७५ वर्षे), देहूरोड – विकासनगर (स्त्री ५५ वर्षे), चाकण (पुरुष ६३ वर्षे), देहूगाव (पुरुष ५८ वर्षे), कराड (पुरुष ७४ वर्षे), कामशेत (पुरुष ५९ वर्षे), मारुंजी (स्त्री ६२ वर्षे), माहूर (पुरुष ८८ वर्षे), राजगुरूनगर (स्त्री ६७ वर्षे) येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६५३७९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४७७९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १०६५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.