न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर. २०२०) :- पुणे इंटरनॅशनल स्कूलकडुन कोरोना आजाराच्या महामारीच्या काळात सर्व पालकांची व विद्यार्थ्यांची फीसाठी पिळवणूक होत असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुराव्यासहित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
याची दखल घेत, शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ चौकशीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शहर मनसेचे उपशहराध्यक्ष राजाभाऊ सावळे, मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर, उपविभागाध्यक्ष मयुर हजारे व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.