न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोरोनाचे तात्पुरते रुग्णालय आणि राज्य शासनाने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे सुरू केलेल्या जम्बो रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने २ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
ऑटो क्लस्टर रुग्णालयासाठी – नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. राहुल गायकवाड आणि मगर स्टेडियम जम्बो रूग्णालयासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुनील पवार यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त व रूग्णालय कार्यकारी समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे.
नव्याने निर्माण केलेल्या रूग्णालयात रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून हे तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. हे दोन्ही डॉक्टर नोडल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवालाची पडताळणी करणे. कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे नियोजन करणे. वैद्यकीय उपकरणे पुरविणे. डॉक्टर व रूग्णांच्या तक्रारींचे निवारण करणे. वैद्यकीय कामकाजाकरीता मनुष्यबळ पुरविणे. कामकाजाचे नियोजन करणे आदी कामे त्यांच्यामार्फत केली जाणार आहेत.