न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- सोसायटीत बेकायदेशीर लाऊडस्पीकर लावून धिंगाणा घातल्याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मारुंजी येथील एक्झरबिया सोसायटीत बुधवारी (दि. १६) रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. माधव यशवंत काळे, निखिल भीमा बनसोडे, अथर्व मनोज मुसमोड, अभिजित सुरेंद्र आमले, मयूर कैलास गोरे, रवींद्र अशोक गरदरे, संकेत पंढरीनाथ भगत, प्रतीक महेश ढोकचौळे व अन्य तीन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सुधीर दत्तात्रय शिंदे २९, रा. दत्तवाडी, हिंजवडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मारुंजी येथील एक्झरबिया सोसायटीमध्ये एका सलून दुकानासमोर वरील सर्व जण स्पीकरवर मोठमोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घालत होते. कोरोना साथीच्या काळात हे प्रकार सुरू असल्याने शिंदे यांनी त्यांना हटकले. यावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला हॉकी स्टिकने मारहाण करून जखमी केले.