न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. शुक्रवारी (दि १८) सकाळी हा प्रकार भोसरी एमआयडीसी हद्दीतील फुलेनगर येथे उघडकीस आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
गोदावरी गुरुबसप्पा खजुरकर (वय ३० रा. भोसरी) असे या महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या कर्नाटक येथील आहेत. शुक्रवारी त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्य झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या महिलेच्या कर्नाटकातील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी त्या महिलेच्य पतीचे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले. त्या विरहामुळे आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. आई – वडील सोडून गेल्याने त्यांची दोनही मुले पोरकी झाली आहेत.