न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- कुख्यात रावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे व ३५ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल जप्त केला. चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
विकी ऊर्फ अनिरुद्ध राजू जाधव (वय २४), मन्या ऊर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय २२, दोघे रा. रावेत), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. झिरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तपास पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे.
गुरुद्वारा चौकाकडून तहसील कार्यालयाकडे रेल्वे पटरीच्या खालून जाणा-या रोडच्या बाजूस दोन इसम संशयीतरित्या फिरत आहेत. त्यातील एका इसमाच्या कमरेला हत्यार दिसत आहे, अशी माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले.