न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १९ सप्टेंबर) रोजी ९८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९०३ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे पिंपरी (पुरुष ३८ वर्षे, पुरुष ७१ वर्षे, पुरुष ३० वर्षे), आकुर्डी (स्त्री ३८ वर्षे), चिंचवड ( पुरुष ५३ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ६३ वर्षे, पुरुष ६१ वर्षे), चिखली (पुरुष ६४ वर्षे, पुरुष ६२ वर्षे, पुरुष ४५ वर्षे, स्त्री ६७ वर्षे), भोसरी (पुरुष ५७ वर्षे, पुरुष ४९ वर्षे, पुरुष ६६ वर्षे), किवळे (स्त्री ९० वर्षे), च-होली (पुरुष ५० वर्षे), दिघी (स्त्री ५० वर्षे, पुरुष ६४ वर्षे), फुगेवाडी (स्त्री ५८ वर्षे), फुगेवाडी (पुरुष वर्षे), निगडी (पुरुष ६२ वर्षे), रावेत (स्त्री ६५ वर्षे), आकुर्डी (स्त्री ७९ वर्षे), मोशी (स्त्री ५० वर्षे), बोपखेल (स्त्री ५९ वर्षे), येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे गोखलेनगर (पुरुष ८० वर्षे), हडपसर (पुरुष ७० वर्षे, पुरुष ५२ वर्षे, पुरुष ७२ वर्षे), वारजे माळवाडी (स्त्री ६१ वर्षे, पुरुष ७१ वर्षे, स्त्री ६७ वर्षे, पुरुष ३८ वर्षे, स्त्री ७२ वर्षे), खेड (स्त्री ६५ वर्षे, स्त्री ५२ वर्षे), चिंबळी (पुरुष ७८ वर्षे, स्त्री ६१ वर्षे), वानवडी (स्त्री ६६ वर्षे), लोहगाव (पुरुष ५९ वर्षे), चाकण (पुरुष ५७ वर्षे), बावधन (स्त्री ७३ वर्षे), खेड (पुरुष ३९ वर्षे), औंध (पुरुष ६१ वर्षे), कोथरुड (स्त्री ६६ वर्षे), सातारा (पुरुष ७८ वर्षे), पुणे (पुरुष ५७ वर्षे, पुरुष ६१ वर्षे), आळेफाटा (पुरुष ६९ वर्षे), जुन्नर (स्त्री ६० वर्षे), कर्वेनगर (स्त्री ५७ वर्षे), शिरोळी (पुरुष ५८ वर्षे) येथील रहिवासी आहेत. आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या २५ मृत रुग्णांपैकी काल व आज १० आणि २ दिवसापुर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत १५ आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६९४२३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५८८१७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ११३४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.