- पिं. चिं. शहराने पार केला सत्तर हजार कोरोनाग्रस्त रुग्णांचा टप्पा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २० सप्टेंबर) रोजी ७४९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११५१ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे चिखली (पुरुष ६४ वर्षे, पुरुष ७० वर्षे), पिंपरी (स्त्री ८४ वर्षे), निगडी (पुरुष ४३ वर्षे), काळेवाडी (स्त्री ७५ वर्षे), चिंचवड (पुरुष ७९ वर्षे), भोसरी (पुरुष ७८ वर्षे), पिंपळे निलख (पुरुष ६९ वर्षे) येथील रहिवासी आहेत. तर, पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे विश्रांतवाडी (पुरुष ५० वर्षे),धनकवडी (पुरुष ७१ वर्षे), जुन्नर ( स्त्री ५० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७०१७२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५९९६८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ११४२ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.