न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२०) :- ‘ चल जेवायला. मटणाची भाजी केली आहे ‘ असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. फिर्यादीने मी गुरुदेव दत्ताचा भक्त आहे. मी मटण खात नाही. असे सांगितले यावर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुकी केली. फिर्यादीने प्रतिकार केला असता आरोपीने चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादीच्या हातावर, चेह-यावर गंभीर दुखापत झाली आहे.
हा प्रकार शुक्रवारी (दि. १८) रात्री अकरा वाजताच्या सुमारास काळेवाडी गावठाण, वाकड येथे घडली. बबन (पूर्ण नाव माहिती नाही, रा. काळेवाडी गावठाण, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नागेश शिवाजी कदम (वय ४८, रा. काळेवाडी गावठाण, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.