न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा महिला मोर्चाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात चिंचवड विधानसभा मतदारसंघात कुंदा भिसे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी महापौर माई ढोरे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे, पवना बँकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे आदी उपस्थित होते.
कुंदा भिसे व सोनम मोरे यांची पिंपरी चिंचवड शहराच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून सरिता नेवाळे व रंजना चिंचवडे यांची निवड तर, कोषाध्यक्ष अस्मिता भालेकर, चिटणीस निकिता गोसावी, ओबीसी महिला आघाडी अध्यक्ष सारिका पवार यांची निवड झाली. सांस्कृतिक महिला आघाडी अध्यक्ष नंदा फुगे यांची निवड झाली आहे.