न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातून दोन कार आणि सहा दुचाकी अशी एकूण सहा वाहने चोरीला गेली आहेत. याबाबत शनिवारी (दि. १९ ) संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. वाहन चोरीच्या पहिल्या घटनेत विजय नागनाथ दाखले (३६, रा . सहयोगनगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाखले यांनी त्यांची कार राहत्या घराजवळ गुरुवारी (दि. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कार चोरीस गेल्याचे दिसून आले.
दुसऱ्या घटनेत संजय भालचंद्र किरवे (५२, रा. बाजीराव बारणे चाळ, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी किरवे यांनी त्यांची कार ७ सप्टेंबर रोजी पदमजी पेपर मिलसमोर उभी केली होती. चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली.
तिसऱ्या घटनेत जॉस मॅथियु(५२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जॉस यांची दुचाकी रचना कॉम्प्लेक्स येथून चोरीस गेली. चोरीच्या चौथ्या घटनेत गजानन गोविंदराव कुमावत (३८, रा. महादेवनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गजानन यांची दुचाकी चोरट्यांनी यांच्या घरासमोरून चोरून नेली. वाहन चोरीच्या पाचव्या घटनेत अशोक दादा गव्हाणे (३५, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गव्हाणे यांची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रहाटणी येथील धनगर बाबा मंदिरासमोरून चोरून नेली आहे. वाहन चोरीची सहावी घटना हिंजवडी भागात घडली. रजस दत्तात्रय क्षीरसागर (२६. रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. क्षीरसागर यांनी त्यांची दुचाकी घरासमोर लावली होती चोरट्यांनी पळवून नेली.