न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- भरधाव बुलेटने धडक दिल्याने पादचारी महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. शनिवारी (दि. १९) रात्री पावणेअकराच्या सुमारास लांडगेनगर, भोसरी येथे हा अपघात झाला.
याप्रकरणी पोलिस हवालदार ए. व्ही. पवार यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुलेटचालक हर्षल बाळासाहेब हरिहर (वय २१, रा. जय गणेश साम्राज्य, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पुणे – नाशिक महामार्गावरून पायी जात असताना हर्षल चालवत असलेल्या बुलेटने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.