न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- एका जेष्ठ नागरिकाला १३ मे २०२० रोजी एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. आयसीआयसीआय बँकेच्या मुंबईतील वांद्रा कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. त्यासाठी तुमच्या बोटांचे ठसे लागतील. ठसे घेण्यासाठी आमचा माणूस नंतर येईल. तोपर्यंत मोबाइलवर आलेली सर्व माहिती मला सांगा.
त्यानंतर त्यांनी मोबाइल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) त्याची माहिती संबंधित व्यक्तीला दिली. त्यानंतर खात्यातून ७ लाख ९८ हजार ९९८ रुपये अन्य खात्यात गेले. ही घटना निगडी गावठाणात घडली आहे. शिवराम गोपाळ वैद्य (वय ५७, रा. सुभश्री, निगडी गावठाण) यांनी निगडी पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस तपास करीत असून, निगडी पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.