न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरू असताना पिकअप गाडी पळवून नेल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तळेगाव दाभाडे येथे दुचाकी चोरीची नोंद झाली आहे. दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बावधन येथील ड्रीम सोसायटी जवळील रतन ग्लास दुकानासमोर लावलेली पिकअप गाडी २० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते साडेअकराच्या दरम्यान चोरीला गेली. आखेदान रानीदान चारण ( वय ४९, रा. बेलठिकानगर, थेरगाव) यांनी ३ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी चोरीला गेल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. विशाल दत्तात्रय टोपे (वय २६, रा. वाकी, ता. खेड) यांची दुचाकी सोमाटणे येथून २० सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या समारास चोरीला गेली.