- सत्तारूढ पक्षनेत्यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- वाकड – ताथवडे प्रभाग क्रमांक २५ मधील ताथवडे गावठाणापासून जीवननगर मार्ग सर्व्हे क्रमांक ९९ ते १०० पुनावळेकडे जाणारा २४ मीटरचा रस्त्यासाठी वर्षापूर्वी ३२ कोटी रुपयांचे काम मंजूर झाले. मात्र, रस्त्याची बहुतांश जागा ताब्यात नसल्याने ठेकेदाराला वर्षभरात केवळ १ कोटी ६३ लाखांचे काम करता आले.
कामाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामांसाठी देखील जागा ताब्यात नाही. यातून आयुक्तांचाही कचखाऊपणा दिसून येत आहे, अशी टीका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राहुल कलाटे यांचे नाव न घेता गुरुवारी (दि. २४) केली आहे.
ठेकेदारास रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर १८ सप्टेंबर २०१९ ला दिली गेली. वर्षभरात केवळ एक कोटी ६३ लाखांचे काम झाले आहे. जागा ताब्यात नसल्याने ठेकेदारास काम करण्यास पुढील चाल देण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे. दुसरीकडे त्याच रस्त्याच्या पुढील कामाचे १०० कोटींची कामे कोरोना महामारीच्या काळात घाईघाईत मंजूर करण्यात आले आहेत. कामे मंजूर करताना रस्त्याची जागा ताब्यात असल्याचे भासवत कामे काढली जात आहेत. त्यामुळे विनाकारण तरतूद अडकून पडत असल्याकडे ढाके यांनी लक्ष वेधले.