न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड (वय ५८) यांचे आज (शुक्रवारी) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
पंधरा दिवसांपूर्वी प्रदीप गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान, महिन्यापुर्वीच त्यांचे थोरले बंधू आणि अंध विद्यार्थ्यांचा आश्रम चालविणारे आप्पा गायकवाड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. महिन्याभरात दोन भावांचे निधन झाले आहे. गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रदीप गायकवाड यांच्या निधनामुळे पक्षाचा सच्चा, निष्ठावान कार्यकर्ता गमावल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केली.