न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा दि. ११ ऑक्टोंबर २०२० रोजी व संयुक्त पुर्व परीक्षा दि. २२ नोव्हेंबर २०२० रोजी होत आहेत. या परीक्षेसाठी पिंपरी चिंचवड शहरामधुन बरेच विद्यार्थी बसलेले आहे.
या सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांनी शहरातील अण्णाभाऊ साठे अभ्यासिका उपलब्ध करुन मिळणेसाठी शहरामधील अभ्यासिका सुरु करुन देणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्याने शहरातील स्पर्धा परीक्षार्थ्यांची निकड लक्षात घेता त्यांना अभ्यासासाठी शहरातील अण्णाभाऊ साठे अभ्यासिकेसह सर्व अभ्यासिका उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी शहर मनसे अध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी पालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.