- ०९ ऑक्टोबर रोजी पालिकेच्या पवळे सभागृहात होणार निवडणुका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरातील ८ क्षेत्रीय कार्यालय समिती अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे. त्यांनी याबाबत महापालिकेला आदेश दिले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह सभापती पदाची निवडणूक (दि. ०९ ऑक्टोबर) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात होणार आहे.
पालिकेकडून या संदर्भातील नियोजनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी बैठक मंगळवारी (दि. २२) आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेचे अति. आयुक्त (२) यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालय समिती अध्यक्षांच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह प्रभाग समितीच्या सभापती पदाच्या निवडणूकीसाठी तारीख निश्चित करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पालिकेचे अति. आयुक्त (२) यांना निवडणुका घेण्यासंदर्भात आदेशित केले आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
‘अ’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक दि. ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता होईल.
त्यानंतर ‘ब’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ‘अ’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर.
‘क’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ‘ब’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर.
‘ड’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ‘क’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर.
‘इ’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ‘ड’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर.
‘फ’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ‘इ’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर.
‘ग’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ‘फ’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर.
‘ह’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ‘ग’ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर होणार आहे.
ही सभा श्रीम. प्रेरणा देशवतार, भा.प्र.से. आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडेल, या सभेचे कामकाज पिठासीन अधिकारी हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ४५६ अ, पोट कलम ( १ ) आणि पोट कलम ( २ ) चे परंतुक या सह महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २ ९ अ ( ४ ) यासह संदर्भ क्र. १२ नुसार निवडणूक घेतील. तसेच संदर्भ क्र. ३ अन्यये नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र दिनांक ०३ जुलै. २०२० रोजीच्या पत्रात नमुद केले प्रमाणे सदरची सभा Video Conferencing द्वारेच घ्यावी तसेच सदर सभेच्या निवड प्रक्रियेचे इतिवृत्त व सर्वप्रकारचे अभिलेख जतन करणेत यावेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करुन इतिवृत्तांताचा अहवाल दुसऱ्या दिवशी विभागीय आयुक्तांकडे सादर करावा, असे सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे यांनी म्हटले आहे.
पालिकेच्या एकूण ३२ प्रभागानुसार ८ क्षेत्रीय समिती कार्यालय आहेत. त्या समितीवर ४ प्रभागातील १६ नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडला जातो. प्रभाग अध्यक्षांचा वर्षभराचा कार्यकाळ एप्रिल २०२० ला संपला आहे.