- आज शुक्रवारी ८५६ जणांना कोरोनाची बाधा तर, ४९ जणांचा मृत्य; १३१८ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २५ सप्टेंबर) रोजी ८५६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १३१८ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे च-होली (पुरुष ७१ वर्षे), रहाटणी (पुरुष), नेहरुनगर (स्त्री ६५ वर्षे), मोशी (पुरुष ८ वर्षे), खराळवाडी (स्त्री ७२ वर्षे), वाकड (स्त्री ५४ वर्षे, पुरुष ८२ वर्षे), पिंपळेगुरव (पुरुष ५३ वर्षे), थेरगांव (पुरुष ५६ वर्षे, पुरुष ५० वर्षे), काळेवाडी (पुरुष ५८ वर्षे), दिघी (पुरुष ५२ वर्षे), देहूरोड (पुरुष ६३ वर्षे), चिंचवड (पुरुष ६५ वर्षे, पुरुष ३५ वर्षे, पुरुष ६५ वर्षे), कुदळवाडी (स्त्री ६० वर्षे), भोसरी (पुरुष ४० वर्षे), आकुर्डी (स्त्री ६५ वर्षे, स्त्री ५८ वर्षे), काळेवाडी (स्त्री ३५ वर्षे), निगडी (पुरुष), पिपळे निलख (पुरुष ५९ वर्षे), येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेला रुग्ण हे शिवणे (स्त्री ५८ वर्षे), पुणे (पुरुष ५७ वर्षे), सिंहगड रोड (पुरुष ८० वर्षे), चाकण (पुरुष ४० वर्षे), आंबेगांव (पुरुष ७१ वर्षे, स्त्री ५० वर्षे), धायरी (पुरुष ८३ वर्षे), खेड (पुरुष १९ वर्षे, पुरुष ७० वर्षे, पुरुष, पुरुष, पुरुष), सोमाटणे फाटा (स्त्री ५५ वर्षे), कोल्हापूर (पुरुष ६९ वर्षे), सातारा (पुरुष ६७, स्त्री ४५ वर्षे), लोणीकंद (पुरुष ५२ वर्षे), शिरुर (पुरुष ५९ वर्षे, पुरुष ८१ वर्षे), बार्शी (पुरुष ५८ वर्षे), नारायणगांव (स्त्री ७२ वर्षे), बालेवाडी (पुरुष ४१ वर्षे), कात्रज (पुरुष ५४ वर्षे), जुन्नर (पुरुष, पुरुष), खडकीबाजार (स्त्री ७० वर्षे) येथील रहिवासी आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या २३ मृत रुग्णांपैकी २४ तासांमध्ये ०८ रुग्णांचा मृत्यु झालेले आहेत आणि यापुर्वी मृत आलेले परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत्यू १५ आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७४११६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६५१३२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १२२९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.