- निगडीतील भक्ती शक्ती समूहशिल्प कामाचा निधी ताब्यात नसलेल्या रस्त्यासाठी खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- भक्ती शक्ती समूह शिल्प हे संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड शहराची अस्मिता आहे. पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. त्यामुळे या अस्मितेवरच सत्ताधारी भाजपाने घाला घातला आहे. प्रभाग क्र. १५ मधिल भक्ती शक्ती चौक येथे ग्रेड सेपरेटर व उड्डानपुलाचे सुशोभिकरण करणेकामी रंगीत दिवे प्रणाली विषयक कामे करणे या कामातून सुमारे ५० लाख वर्ग करण्यात आलेले आहेत.
हे वर्गिकरण कोरोना सारख्या महत्वाच्या विषयासाठी केले असते, तर आमचे काही म्हणणे नव्हते परंतु, प्रभाग ३२ मधिल महापौराच्या प्रभागातील रस्ते अद्ययावत करण्यासाठी व तेही जागा ताब्यात आली नसताना करणे, म्हणजे भाजप सत्ताधारी कोणत्या थराला गेलेत, हे दिसते. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषद सत्ताधारी भाजपवर केला आहे.
सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ५ ला सत्ताधारी भाजप पक्षाने उपसुचनेव्दारे सुमारे १ कोटी २६ लाख रुपये प्रभाग क्रमांक ३२ मधिल नँशनल स्कुल (शुभश्री बिल्डींग) ते स्पायसर पुलापर्यत व परीसरातील रस्ते अद्यायावत पध्दतीने विकसित करणे. या कामासाठी वेगवेगळ्या कामांमधून तरतूद वर्ग केली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोणत्याही नगरसदस्यांच्या प्रभागातील निधी अन्य प्रभागात वर्ग करुन दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.