न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण मार्गी लावा. त्यासाठी भूसंपादनाचे अडकलेले विषय मार्गी लावा. निविदा प्रक्रियेची तयारी करा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बैठकीत दिले, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
नाशिक फाटा ते मोशी रस्तारुंदीकरण कामातील अडचणीबाबत आज अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
बैठकीबाबत विचारले असता आयुक्त हर्डीकर म्हणाले की, डीपीआर तयार झाला आहे. अंतिम टप्प्यातील कामे, तसेच भूसंपादनाचे अडकलेले विषय मार्गी लावा. निविदा प्रक्रियेची तयारी करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.