न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृतांची संख्या लक्षात घेता ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे. एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीला जीवदान मिळाल्यानंतर तो सुद्धा एखाद्याचा जीव वाचवू शकतो. त्यासाठी बऱ्या झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वच्छेने पुढे आले पाहिजे.
याबाबत पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषभाऊ बारणे मित्र परिवार यांच्या सौजन्याने उद्या रविवारी (दि. २७) रोजी देहु-मोशी रोड येथील सिल्वर ९ येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत प्लाझ्मादान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे म्हणाले की, ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची संधी प्लाझ्मादान व रक्तदानासारख्या माध्यमातून आपल्याला मिळते. त्यामुळेच रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे़. मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते. आपणही एखादा जीव वाचवु शकता, कर्तव्य समजून बहुसंख्य नागरिकांनी या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन बारणे यांनी केले आहे.
या शिबिरासाठी कर्तव्यम फाउंडेशन व मोरया ब्लड बँक यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिराबाबत अधिक माहितीसाठी कर्तव्यम फाऊंडेशनचे
राकेश गायकवाड मो. नं. ८९७५४०२७२७ तसेच पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन, मोशी विभाग अध्यक्ष शाम मार्के ९८२२२६९८९४ यांच्याशी संपर्क साधावा.