- पुढील ७० दिवसांनी रुग्ण दुप्पट होतील; आयुक्त हर्डीकरांचे भाकीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचे दिवस वाढत चालले आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी ३८ दिवसांवर खाली आला होता. आता ३८ दिवसांवरून ७० दिवसांवर गेला आहे.
आता ७० दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सध्या दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आजपासून पुढील ७० दिवसांनी रुग्ण दुप्पट होतील, असे भाकीत आयुक्त हर्डीकर यांनी वर्तविले आहे.