न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. पोलीस आयुक्तालयातील अप्पर पोलीस आयुक्त यांना देखील करोनाबाधित झाले असून, ते सध्या होम क्वारंटाइन आहेत. शिवाय, दोन पोलीस उपायुक्त बाधित असल्याने अगोदरच त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलीस दलात करोनाने शिरकाव केला असून संख्या वाढत असल्याने पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४६४ जण करोनाबाधित असून, यापैकी ४९ अधिकारी आणि ३६८ कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे.
तर, ४५ कर्मचारी, अधिकारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन कर्मचाऱ्यांचा करोनाशी झुंज देत असताना मृत्यू झाला आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये दोन पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.