- येत्या १४ ऑक्टोबर रोजी परीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना प्रादुर्भावामुळे NEET परीक्षेला हजर न राहता आलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
त्यानुसार, विद्यार्थ्यांची परीक्षा १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. तर, देशातील नीट परीक्षेचा संपूर्ण निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसता येणार आहे.
देशभरात १३ सप्टेंबर रोजी जवळपास ३८४३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जवळपास १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. लाखो विद्यार्थी निकालाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) आज नीट २०२० चा निकाल आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन ntaneet.nic.in जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, आता हा निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता, या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी देण्यात आली आहे.