न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईमधील व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे ३५ लाखांसाठी अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून त्यांची निगडी पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे.
या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून इतर तीन आरोपी फरार आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी माहिती दिली आहे. त्याचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस घेत आहेत. या घटने प्रकरणी निगडी पोलिसात ४३ वर्षीय व्यापाऱ्याने (शेअर मार्केट ब्रोकर) फिर्याद दिली आहे.
संबंधित अपहरणाचा गुन्ह्यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते. त्याचा परतावा न मिळाल्याने शेअर मार्केट ब्रोकर असलेल्या व्यापाऱ्याच्या मॅनेजर चे अपहरण करत ३५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती अस पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शशांक कदम आणि हरीश राजवाडेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुख्य आरोपी अमर कदम यांच्यासह तीन जण फरार आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.